
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
अंबड: गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोंदी पोलिसांकडूंन वाळू तस्करांच्या कारवाई हर्सूल मध्यवर्तीं कारागृहात एका वर्षासाठी रवानगी केली आहे. यामध्ये आरोपी नामें. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली देवीदास खरात (वय 35 रा. सिध्देश्वर फाटा गोंदी ता अंबड ) गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोदावरी नदी पात्रात कोणाच्या साह्याने अवैध वाळू उत्खनन करून त्याच्या चोरटे वाहतूक करणारे वाळू चोरीवर कारवाई करण्यात करता. आलेल्या शासकीय लोकसेवक यांच्या काम करण्यांस अडथळा निर्माण करण्यात आलेल्यावर गुन्हे दाखल होते. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन त्याच्यावर सदर बाबत स्थानिक गुन्हे शाखा जालना आणि तहसील कार्यालय अंबड येथील प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्याचे वर्तनात काहीच फरक पडत नव्हता. त्या अनुषंगाने
गोंदी पोलीस स्टेशन यांनी मा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खाबे ,पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ स्थानिक शाखा गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक एस.बी.शेख यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. गोंदी पोलीस ठाणे यांनी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे आरोपी नामें. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली देवीदास खरात यांस एका वर्षासाठी कारागृहात आरोपींची रवानगी करत स्थानबद्धची कार्यवाही केली आहे.