
दैनिक चालू वार्ता
प्रवीण पवार दौंड प्रतिनिधी
संपर्क:- 9923531092
दौंड नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया व दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी ( DYSP ) यांच्यात वाद
या निषेधार्थ नागरिक हित संरक्षण मंडळ व आरपीआय (आठवले गट) पी.आर.पी ,च्या वतीने दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा नेण्यात आला या मोर्चामध्ये नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद अग्रवाल, राजेश पाटील, दौंड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शीतल कटारिया,
आर पी आय चे रविंद्र कांबळे, प्रकाश भालेराव, पी आर पी चे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे, त्याच बरोबर माजी नगरसेवक बबलु कांबळे, राजू बारवकर, अकबर सैय्यद, रतन जाधव ,गणेश शिंदे ,अमोल काळे नागरिक हित संरक्षण मंडळ व आर पी आय आघाडी, आमदार राहुल दादा कूल मित्र मंडळाचे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाचे नियोजन हरिओम कलर लॅब प्रांगण येथून सुरुवात झाली यावेळी कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली कार्यकर्त्याकडून निषेध करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी हे आपले कर्तव्य बजावित असताना शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी विविध पक्षांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय असभ्य पद्धतीने वागतात त्यांच्याकडून सामान्यांना मिळणारी वागणूक उद्दटपणाची असते असा आरोप केला आहे त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आंदोलकांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निषेदाचे व मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी 5 डिसेंबर रोजी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान शहरातील गोल राऊंड परिसरामध्ये माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्याशी असभ्य वर्तन केले उपविभागीय अधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे हे त्यांचे कर्तव्यच आहे यामध्ये दुमत नाही परंतु हे सर्व करीत असताना त्यांनी नागरिकांशी गैरवर्तन करणे निषेधार्थ आहे यापूर्वी देखील त्यांच्याकडून नागरिकांशी उद्धट व गैरवर्तनाचे प्रकार झाले असून त्यांच्या विरुद्ध अनेक व्यक्ती पक्ष संघटना यांनी आंदोलने करून त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविला असल्याचे निवेदनात म्हटले आहे घडलेल्या घटनेबद्दल अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या आंदोलकांनी निवेदनातून दिला आहे…