
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा – महाराष्ट्रभर सामाजिक कार्यात सतण अग्रेसर असणाऱ्या आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांच्यावतीने लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे श्री संत बाळुमामा मंदीर कलशारोहण सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य रामकथा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील सप्ताहाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना टि- शर्टचे वाटप करण्यात आले आहे.
दिनांक 12 रोजी रिसनगाव येथे बाळुमामा मंदीर कलशारोहण सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य रामकथेला सुरूवात झाली असून सदरील रामकथेत रामकथा प्रवक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य श्री ह भ प रामरावजी महाराज ढोक यांच्या रसाळवाणीतुन रामकथा श्रवण करण्यासाठी परीसरातील भावीक भक्तांची भरगच्च गर्दी झाली असुन गावातील व परिसरातील स्वयंसेवकांना आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांच्या वतीने रामकथा प्रवक्ते श्री ह भ प रामरावजी महाराज ढोक यांच्या हस्ते टि – शर्टचे स्वयंसेवकांना देण्यात आले यावेळी आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर , प्रसादभाऊ पोले , विठ्ठल पाटील पवार सह आदींची उपस्थिती होती.
आझाद ग्रुपच्या सामाजिक कार्यास रामकथा प्रवक्ते विदर्भभुषण श्री ह भ प रामरावजी महाराज ढोक यांनी शुभेच्छा दिल्या व सदरील कार्याचे रामकथेत कौतुक केले.