
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत रविदास महाराज पुण्यतिथी निमित्त आज मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी संत रविदास महाराज यांच्या फोटोला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लखाड ग्रामपंचायतच्या
सरपंच सौ.अरुणाताई निपाणे, उपसरपंच शेख नदीम,ग्रामपंचायत सदस्य राजेश चौखंडे, नितीन बनचरे,सौ.संगीताताई चौखंडे,धम्मपाल लबडे,पोलीस पाटील राहुल सावरकर,सुनील निपाणे, देवानंद गव्हाळे, विजय सरोदे, वासुदेव हिरे, राजू ताजने, विलास हिरे, संजय हिरे, अशोक हिरे, गजानन ताजने,मंगेश ठाकरे, नितीन निपाणे, किसनराव चौखंडे आदी गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.