
खड्डेमय रस्त्याचे काम तात्काळ करावे विलास सावळे
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा -गंगाखेड महामार्गावरील सुनेगाव ते सुभाषनगर पर्यंत रस्त्यांत खड्डेच खड्डे पडले असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
लोहा शहरातून व तालुक्यातून जाणाऱ्या लोहा -गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर सुनेगाव ते सुभाषनगर पर्यंत गेल्या महिनाभरापासून खड्डेच खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी गत झाली असून या रस्त्यावरून अनेक खड्डे पडून रस्त्याची चाळणी आहे त्यामुळे वाहन धारकांना वाहने चालविताना नाकी नऊ येत आहेत तर नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
खराब रस्त्यामुळे अपघाताचे ही प्रमाण वाढले आहे याकडे लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही.
त्यामुळे जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून लोहा -गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील सुनेगाव ते सुभाषनगर पर्यंत खड्डेमय रस्त्याचे काम तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे सुरू करावे अशी मागणी मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे यांनी केली आहे.