
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / कंधार तालुक्यातील नवघरवाडी येथील जि.प .प्रा. शाळेत दि.२०डिसेंबर २०२३ रोज बुधवार ह्या दिवशी कै. शिवराम पाटील कपाळे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्याध्यापक श्री शिवाजी कपाळे ( गोळेगाव ) यांनी कार्यरत आसलेल्या शाळेतल्या मुलांना कपडे ( ड्रेस )वाटप केले . शिवाजी कपाळे यांनी जि.प प्रा.शाळा शिराढोण ( तांडा ) येथे अनेक सामाजिक व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी अनेक उपक्रम राबले आहेत . माळेगाव यात्रेत विद्यार्थ्यांने नाटीका सादरीकरणात पहिला क्रमांक पटकाविला होता असे विद्यार्थ्यी प्रिय शिक्षक कपाळे यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून त्यानी आपल्या वडीलांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करून चांगला उपक्रम राबविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीस्थानी उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवप्रकाश मुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नवघरवाडीचे सरपंच महेश कारामुंगे, गोळेगावचे सरपंच परमेश्वर पाटील कपाळे पानभोसी येथील जि.प केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पेटकर मॅडम, सौ अनिता दाणे, मन्मथराव किडे , केंद्रप्रमुख उद्धव सूर्यवंशी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जे. एस. काळे केंद्रप्रमुख, माधव कांबळे केंद्रप्रमुख, श्री गायकवाड, श्री कदम , व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री मुळे साहेबांच्या हस्ते शाळेतील मुलांना ड्रेस आणि पायमोजे वाटप करण्यात आले श्री मुळे साहेबांनी पर्यावरण,व सामाजिक बांधिलकी या विषयावर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.