
दैनिक चालु वार्त
पुणे शहर प्रतिनिधी जब्बार मुलाणी पुणे
डेडलाईन पुणे वडगाव बुद्रुक….
आता बातमी आहे पुण्यातील वडगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राधाकृष्ण विहार फ्लॅट नंबर 15 तिसरा मजला ए विंग आनंद नगर सिंहगड रोड पुणे दिनांक 15 11 2023 रोजी रात्री 10,15 वाजण्याच्या सुमारास संजय चंद्रकांत तावरे पुष्कर संजय तावरे राजेश पवार स्वप्निल पवार हे सर्व दारू पिऊन आले व त्यांनी कोणतेही कारण नसताना पीडित महिलेकडे पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली
व सदरील बिल्डिंग वर जाऊन आणखी दारू प्यायला सुरुवात केली दारू पिऊन धिंगाणा घाल असताना सदर महिलेने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही संबंधित सोसायटीमध्ये दारू पिऊ ़नका त्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली व तिच्या भावाला तिच्या आईला तिच्या वडिलांनाही देखील खूप मारहाण केली
तसेच सदर गोष्टीचे कोणतेही भान न ठेवता दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावरील कपडे फाडली तीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले
तिला गलिच्छ जाती वाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला…
पीडित महिलेने वडगाव पोलीस चौकी मध्ये तक्रार केली असता वडगाव पोलीस चौकीचे संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र या अर्जाला केराची टोपली दाखवण्याचे काम केलं आहे पीडित महिलेला नाईलाजाने आमरण उपोषणास बसण्यास भाग पाडले आहे न्याय मागून जर न्याय मिळत नसेल तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे पीडित महिलेला अद्याप न्याय मिळालेला नाही
पाहूया संबंधित पीडित महिलेला न्याय मिळतो का मात्र संबंधित पोलीस प्रशासन बघायची भूमिका पकरत आहे