
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर येथून जवळच असलेल्या चिखली ता.कंधार येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून
नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता दिली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यासाठी जागेची मोठी समस्या निर्माण झाली होती .ही समस्या लोकप्रिय, कर्तव्यदक्ष नांदेड जिल्ह्य़ाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नविन निर्मिती होत असल्यामुळे जागेची अडचण होत असल्याने त्यांनी
स्वतःची दोन एकर जागा देऊन ही अडचण दुर केली.खा. चिखलीकरांनी दाखविलेल्या दानशूरपणा बद्दल कंधार तालुक्यातील नागरिकांनी व चिखली गावच्या नागरीकांनीआभार मानले आहेत. दि. २० डिसेंबर २०२३ रोज बुधवार ह्या दिवशी जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड श्री प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सदरील जमिनीचे दानपत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
चिखली व परिसरातील नागरिकांसाठी चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. या मागणीची दखल घेऊन खा. चिखलीकरांनी पाठपुरावा केला आणि त्याचे फलित म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चिखली येथे नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली. आरोग्य केंद्रास
मान्यता मिळाल्यानंतर या केंद्राची इमारत कुठे
बांधावी, असा प्रश्न निर्माण होऊन जागेची समस्या होती. त्यामुळे खासदार चिखलीकर यांनी चिखली व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सुविधा मिळावी, या हेतूने त्यांनी आपल्या मालकीची चिखली येथील गट क्रमांक १३२ मधील ८० आर ही दोन एकर जागा या आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यासाठी दान म्हणून दिली.
या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असून त्याचा लाभ चिखली व परिसरातील नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागात हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होत असल्याने आणि खासदार चिखलीकर यांनी या आरोग्य केंद्रासाठी स्वतःच्या मालकीची जागा दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून आभार मानले जात आहेत.