दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड /लोहा :- मौजे कलंबर ता.लोहा येथील समाज उन्नती शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांच्या जयंती निमित्त ४ जानेवारी २०२४ गुरूवार रोजी सकाळी ११ वाजता किर्तनकार ह .भ.प. कु. ज्योतीताई धनाडे ( ब्रम्हानाथ नगर , जालना ) मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी किर्तन करून मराठा समाजात लोकजागृती चे काम करणाऱ्या कीर्तनकाराचे हरी किर्तन तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. विश्वांभरराव गंगाधरराव पवार ( उपाध्यक्ष – समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर ) हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड ( अध्यक्ष :- समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर ) मा. श्रीमती मुद्रिकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड ( सचिव :- समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर ) ,मा.डाॅ. सौ. सुरेखाताई विश्वांभरराव पवार ( सदस्य , समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर) यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै.निवृत्तीराव बळीराम पाटील घोरबांड यांच्या जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने शाळेतील चौथी , दहावी , बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा येतोचित संस्थेच्या वतीने सन्मान मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे.
दि.४ जानेवारी रोजी गुरूवारी सकाळी ११ वा. कीर्तनकार ह.भ.प. कु. ज्योतीताई धनाडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहान मुख्याध्यापक श्री .एस.एन.मामडे,प्राध्यापक , शिक्षकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी ,संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक. विद्यालय कलंबर, संजय गांधी वरिष्ठ महाविद्यालय कलंबर ,कै.बळीराम पाटील प्राथमिक शाळा,भोपाळवाडी ता.लोहा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
