म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा -अंजुमन हायस्कुल व ज्यु. कॉलेज म्हसळा येथील कर्मचारी श्री दळवी इनायुतुला शहाबोद्दीन यांची आज सेवा निवृत्ती जवळ जवळ 28, वर्षाचा कालावधी शाळेची प्रामाणिकपणे सेवा करत, शाळेच्या प्रत्येक घटकाशी जुळवून घेत आपल्या कामांनी मने जिंकण्याचे काम दळवी यांनी केले. मूळचे बोर्ली मांडला येथील शाळेत 21 वर्ष सेवा केंली हि सेवा करत असताना सर्वांशी प्रेमाने, संयमाने व आपल्या शांत स्वभावाला व त्यांना आठवण केल जाईल या 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा समाप्त होत असताना. कुठे तर त्यांची कमी नक्कीच जाणवेल. सेवानिवृत्ती च्या माध्यमातून शाळेच्या वतीने चेरमन नसिर अब्दुल रहेमान मिठागरे, अध्यक्ष फजल हळदे, सदस्य बशीर हळदे, मा. मुख्याद्यापक श्री तांबे, मुख्याद्यापक घराडे, शिक्षक वर्ग उपस्थित होता अनेकांनी दळवी यांच्या कामाबद्दल, कार्याबद्दल आपले विचार मांडले व शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अब्दुलरेहमान घराडे यांनी केले तर आभार प्रा. मुद्दसर यांनी केले…
