
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
सोलापूर (माढा):दि.०६ जानेवारी २०२४ मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री गंगाधर जांभेकर यांच्या जयंती व मराठी पत्रकार दिनानिमित्त नरसिंह प्रतिष्ठान, नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने टेंभुर्णी शहर व ग्रामीण भागामध्ये आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती चे मौलिक कार्य करणाऱ्या व समाजापुढच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या पत्रकार बंधूंचा सन्मान करून आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला.
यावेळी टेंभुर्णी शहरातील सर्व पत्रकारांना फेटा बांधून त्यांचे हलगीच्या वाद्यात भव्य स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली नरसिंह प्रतिष्ठानच्यावतीने उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला यावेळी नरसिंह प्रतिष्ठानच्यावतीने प्रास्ताविक मध्ये बोलताना गणेश शिंदे यांनी सांगितले की, नरसिंह प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम नेहमी राबवत असते असे सांगून आपल्या लेखणीच्या जोरावर समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे खरेखुरे आधारस्तंभ म्हणजे पत्रकार त्यामुळे पत्रकारितेकडे उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता पत्रकारिता हे आपलं कर्तव्य आहे असे समजून कोणत्याही दबावाला आमिषाला बळी न पडता निपक्षपातीपणे घडलेली घटना जशी तशी वाचकापर्यंत पोहोचवावी व वैयक्तिक हेतू व स्वार्थासाठी कोणाला त्रास देण्याच्या उद्देशाने बातमी लावू नये तसेच अन्यायाला बळी पडलेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी, खेळाडू,शेतकरी, व्यापारी व जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मारून ते सोडवण्यासाठी मदत करावी.
यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून निपक्षपातीपणे समाज जागृतीचे कार्य करणारे व जनसेवेचे व्रत घेतलेल्या पत्रकारितेच्या लेखणीला अधिक बलशाली करण्याच्या हेतूने दैनिक पुढारी चे पत्रकार सदाशिव पवार, दैनिक स्वराज चे सिद्धेश्वर शिंदे, तसेच दैनिक चालु वार्ता इंदापूरचे प्रतिनिधी बापूसाहेब बोराटे यांना योगेश बोबडे, प्रा. रवींद्र कुणाळे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बोबडे, सोमनाथ ताबे, डॉ. विनायक गंभीरे, नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पवार, सोमनाथ महाडिक,गणेश गायकवाड, व मान्यवरांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार
देण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड.नितीन राजगुरू, योगेश बोबडे, भाऊसाहेब महाडिक,सचिन होदाडे, ऋषिकेश बोबडे यांनी नरसिंह प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी नरसिंह प्रतिष्ठानचे ब्रह्मदेव गायकवाड, सुनील गायकवाड, अभिषेक गायकवाड, आकाश पवार, सतीश पवार, नागेश गायकवाड, प्रशांत शिंदे, असिफ पिंजारी,कीर्तिकुमार पवार, अनिकेत गायकवाड, शुभम गायकवाड, गणेश कदम, दयानंद पवार, विकास पवार, विजय बापू खटके, गणेश व्यवहारे, सचिन पवार व अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज टेंभुर्णी शहर चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज वजाळे यांनी केले.