
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
गद्दारानी राज्यात सत्ता स्थापन करून खऱ्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा जो घाट घातला आहे तो घाट या महाराष्ट्रातील सुजाण नागरिक कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. सत्तेचा गुलाम असलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा दिल्लीकरांच्या इशाऱ्यावरचा निर्णय आहे. त्यामुळे जनतेच्या मनातून उद्धव ठाकरे यांना संपवणे कोणालाही शक्य नाही . येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जनताच गद्दार शिवसेनेचा आणि भाजपाचा खरा निकाल देईल असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी व्यक्त केला