
उस्माननगर विभागातील शिक्षकांचा निर्धार…
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभागाद्वारे सतत अभिनव प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धात्मक अभियान असलेल्या ” मुख्यमंत्री, माझी शाळा, सुंदर शाळा ” या उपक्रमाचा समावेश आहे.
या अभियान मध्ये उस्माननगर विभागातील सर्व शाळांनी सहभागी होवून यशस्वी होण्यासाठी जिद्दीने काम करण्याचा निर्धार केला आहे.
उस्माननगर विभागातील सर्व शाळांतील मुख्याध्यापकांची मंगळवारी ( दि. ९) रोजी चिखली ( ता. कंधार) येथे अभियान पूर्वतयारीची विशेष बैठक शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मेटकर,केंद्रप्रमुख जयवंत काळे, साधनव्यक्ती,यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या अभियानात शाळांशाळांतून परस्परांशी होणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालना मिळेल.
या अभिनव अभियानात, शाळांच्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे,महावाचन महोत्सव, माझी शाळा, माझी परसबाग, सार्वजनिक स्वच्छता अंतर्गत ” स्वच्छता मॉनिटर-टप्पा २” हे अभियान राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे अभियान यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, पालक, गावकऱ्यांची मदत घेऊन स्पर्धेत मोठे यश मिळवण्यासाठी सामुहिक प्रयत्न या विभाग स्तरीय बैठकीत करण्यात आला. यावेळी अंतर्गत शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते…