
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन…
दिनांक ०७ जानेवारी रोजी अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण या गावात वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन धुमधडाक्यात करण्यात आले.
वंदनीय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या विचारावर सर्व युवकांनी चालावे व निर्व्यसनी राहून आपल्या कुटुंबाला व वंदनीय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या विचारांना साथ द्यावी असे वंचित बहुजन युवा आघाडीचे महा सचिव श्री बिबीशन भाऊ चाटे यांनी उद्घाटन प्रसंगी आपले विचार प्रगट केले. सदर उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडीचे निरीक्षक अमोल लांडगे, युवा जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के ,युवा महासचिव बिबीशन भाऊ चाटे, युवा महासचिव अक्षय भुंबे, शहराध्यक्ष अमोल हातागळे, लक्ष्मण ओव्हाळ ,अनिल कांबळे ,अभिप्राय भैय्या मस्के, महेश भैया शेप, अरुणजी बनसोडे तसेच तालुक्यातील पदाधिकारी आणि भरपूर प्रमाणात तरुण उपस्थित होते.