
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
वरळी :- दि.१० जानेवारी २०२४ रोजी वरळी येथील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांची जय गोपीनाथ प्रतिष्ठान च्या शिष्टमंडळाने भेट घेतली व जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला . यावेळी जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री बबन बारगजे तसेच आधारस्तंभ विजय गोल्हार अध्यक्ष सुभाष आंधळे सचिव हनुमंत विघ्ने खजिनदार संग्राम केंद्रे उपसचिव विठ्ठल घोळवे उपखजिनदार पप्पू सोनवणे कार्याध्यक्ष भगवान जायभाये रायगड जिल्हाध्यक्ष किरण गीते उरण तालुका अध्यक्ष अर्जुन डोंगरे उरण तालुका उपाध्यक्षा आश्वीनी मुंडे कार्यालय प्रमुख विठ्ठल गुट्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजाताईंना प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली व पंकजाताईंनी सुद्धा कार्यकर्त्यांना आस्वस्थ केले की तुम्ही चांगलं काम करत आहात काही मदत लागली तर आवश्यक सांगा व मी तुमच्या सदैव पाठीशी आहे तसेच राहील असे सांगितले.