
५२ बैल जोड्यानी घेतला सहभाग…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडेरायाच्या माळेगाव यात्रेत यंदा प्रथमच तब्बल १५ वर्षांनंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व लोहा पं.स.चे माजी सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर , उपसभापती नरेंद्र गायकवाड, यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून व माळेगाव ग्राम पंचायत कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शंकरपट स्पर्धेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन एकुण ५२ बैलगाडी जोड्यानी सहभाग नोंदवला तर या शंकरपट स्पर्धेत एकापेक्षा बैलगाडी जोड्यानी प्रचंड वेगात व जोशात बैलगाडी पळून काही सेकंदात थरारसह शर्यतीत अंतर कापले व हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या स्पर्धेला दाद दिली.
या शंकरपटात विजयी झालेले स्पर्धेत झालेले स्पर्धेक पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक आरिफखाॅन जुमाखाॅन फुलसांगवी ता . महागाव यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.५० सेकंदात पार केले त्यांना २१ हजारांचे प्रथम पारितोषिक खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुतणे युवानेते सचिन पाटील चिखलीकर, माजी पं.स. सभापती आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.
तर द्वितीय क्रमांक – कु.आरती संतोष अलडापुर यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.६५ सेकंदात पार केले त्यांना माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माळेगाव यात्रा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच स्व.रुस्तुमराव धुळगुंडे यांच्या स्मरणार्थ १५ हजार रूपये रोख माळेगांव यात्रा ग्राम पंचायतीचे सरपंच हनुमंत रूस्तुमराव धुळगुंडे यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच तिसरा क्रमांक -पांडूरंग आनंदराव वाघमारे -वारंगा ता . कळमनुरी यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.६७ सेकंदात पार केले त्यांना १००० रुपये बक्षीस लोहा पं.स. चे प्रभारी बीडीओ आडेराघो यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच प्रोत्साहनपर बक्षीस चौथा क्रमांक – प्रतिक गजानन दळवी – दावडीता ता. वसमत यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.७१ सेकंदात पार केले., पाचवा क्रमांक – दामोदर बापुराव गारकर अनगळी ता.औढा नागनाथ यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.७४ सेंकदात पार केले,सहावा क्रमांक -श्रुती अरविंद पाटील दांडेगाव ता. वसमत यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.७४ सेकंदात पार केले, सातवा क्रमांक – भागवत विठ्ठल कदम पिंपराळा ता.वसमत यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.७७ सेंकदात पार केले,आठवा क्रमांक – रामराव बळीराम तांबोळी यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.८० सेकंदात पार केले, नववा क्रमांक -सर्जेराव गंगाधर बोबडे मोरगाव ता.परभणी यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.८३ सेकंदात पार केले, दहावा क्रमांक माधव कराळे दांडेगाव ता.वसमत यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.८६ पार केले, आकरावा क्रमांक – अश्विनी दिलीप मंदाडे यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.८६ पार केले ,बारावा क्रमांक – किशन गणपतराव खराडे चिंचगाव ता.नांदेड यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.८७, सेकंदात पार केले, तेरावा क्रमांक -खंडू निळकंठ पावडे वडगाव या.हदगाव यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.८९ सेकंदात पार केले, स्पर्धेतील चौदावा क्रमांक – किशन माधवराव सोलव बरबडा ता.परभणी यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ४.९९ सेकंदात पार केले, पंधरावा क्रमांक -धोडीबा नागोराव वाघ नाळेश्वर ता.नांदेड यांच्या बैलजोडीने स्पर्धेतील अंतर अवघ्या ५.०५ सेकंदात पार केले.
स्पर्धेतील १२ जणांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सदरील स्पर्धेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला हजारो यात्रेकरूनी सदरील स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा पं.स.चे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, माळेगाव यात्राचे सरपंच प्र.हनुमंत धुळगुंडे, दापशेडचे सरपंच वीरभद्र राजुरे आदीने परिश्रम घेतले.