
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
आयएएस प्रशासकिय अधिकारी कितीही चांगले असले तरी त्यांच्या हाताखाली काम करणारी यंत्रणा कुचकामी असेल तर शासनांची योजना व प्रशासकीय अधिकाऱ्याची संकल्पना ही फोल ठरते याचाच प्रत्यय माळेगाव यात्रेत यंदा आला असुन माळेगाव यात्रेत स्वच्छतेचा बोजवारा उडाला जागोजागी कचरा व प्लाॅस्टीकचे ठिगारे पडले असुन लोहा पं.स.ची प्लाॅस्टीक मुक्ती फक्त कागदावरच असल्याचे चित्र माळेगाव यात्रेत पहावयास मिळत असुन जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला लोहा पं.स.चे गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी माळेगाव यात्रा सुरू होण्याच्या पूर्वी जि.प. च्या माळेगाव यात्रेच्या जवळपास १६० एकर जागेवरील अतिक्रमण काढून धडाकेबाज निर्णय घेतला या निर्णयाचे जनतेतून फार कौतुक झाले.
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा ही शासकीय स्तरावर दि. १० जानेवारी पासून सुरू झाली व १५ जानेवारीला संपली आणखी माळेगाव यात्रा ही ८ ते १० दिवस राहते ग्रामीण भागातील नागरिक हे लाखोंच्या संख्येने माळेगाव यात्रेत येतात येथे मुलभूत सोयीसुविधेचा बोजवारा उडाला असुन प्लाॅस्टीक मुक्ती संकल्पनेचे तीन तेरा वाजले आहेत माळेगाव यात्रेत प्लाॅस्टीकचे ठिगारे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. लोहा पं.स.ची प्लाॅस्टीक मुक्ती ही केवळ कागदावरच आहे.
लोहा पं.स.चे प्रभारी बीडीओ, विस्तार अधिकारी, कर्मचारी,, ग्रामसेवक यांनी दि. १० जानेवारी माळेगाव यात्रेच्या पहिल्या दिवशी मासिक सभा घेऊन हातात हॅन्ड क्लोज घालुन प्लाॅस्टीक मुक्तीची शपथ घेतली व जि.प. शाळेत व आकाशी पाळण्याच्या रोडवरील थोडेफार प्लाॅस्टीकच्या बाटल्या , ग्लास उचलुन फोटोसेशन करुन देखावा केला व दुसऱ्या दिवशी पासून याकडे पाठ फिरवली त्यामुळे माळेगाव यात्रेत प्लाॅस्टीकचा कचरा मोठ्या प्रमाणात पसरला आहे जागोजागी ढिकारे दिसत आहेत तसेच माळेगाव यात्रेत या प्लास्टिकच्या कचऱ्या बरोबरच मोठ्या प्रमाणात धुळ पसरली आहे. खराब फळे, अन्न ,ही फेकून दिले तसेच अनेक ठिकाणी उघड्यावरील शौचालयमुळे काही भागात दुर्गंधी ही पसरली आहे.
तेव्हा याकडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन लोहा पं.स. च्या गटविकास अधिकाऱ्यांसहीत सर्व अधिकारी ,कर्मचारी, सर्व ग्रामसेवक यांच्याकडून माळेगाव यात्रेत स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून प्रदुषण मुक्त माळेगांव यात्रा करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.