
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावचे सुपुत्र संतोष राजगुरू यांना रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा सारथी पुरस्कार नेहरू सेंटर मुंबई येथे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त कांची पिठाचे शंकराचार्य नरसिंह सरस्वती विजयानंद जी महाराज यांच्या शुभहस्ते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये रिटायर आयपीएस अधिकारी रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर टी एस भाल, लिज्जत पापड उद्योग समूहाचे एमडी व रेड स्वस्तिक सोसायटीऑफ इंडियाचे अखिल भारतीय चे अध्यक्ष सुरेश कोते, रेड स्वस्तिक चे वर्किंग चेअरमन चौगुले , भगवानराव राऊत , बिपिन भाई पटेल, रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे जॉईंट एमडी अशोक शिंदे, रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गोरे साहेब,रवी प्रेम चीप ऑपरेटिंग ऑफिसर फॉर्बस अँड कंपनी डॉक्टर अनमोल सोनवणे हार्ट सर्जन मुंबई, निर्मल जगावत चीफ फायनान्स ऑफिसर फॉर्ब्स बस अँड कंपनी, प्रीती काकडे चिप ऑफिसर ई म वरसेल आणि ए आय कंपनी, विलास पराटे जनरल मॅनेजर एफ एफ अँड आर आर बी बँक ऑफ इंडिया, मुंबई रिटायर अपर जिल्हाधिकारी गवळी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संतोष राजगुरू यांना सारथी या पुरस्काराने नेहरू सेंटर मुंबई या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, संतोष राजगुरू हे गेल्या वीस वर्षापासून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया पुणे ब्रांच वतीने वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते व ते रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत.
संतोष राजगुरू हे सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस, श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज सेवाभावी तीर्थक्षेत्र आरण तालुका माढा.जि. सोलापूर येथे विश्वस्त म्हणून या व अनेक ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून सामाजिक सेवेत सेवा हि धर्म आहे असे म्हणून कार्यरत आहेत. खरेतर संतोष राजगुरू यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत आणि कुठलाही त्यांना अहंकार गर्व एवढी पदा जवळ असताना सुद्धा दिसत नाही, ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यंत त्या स्थरावरती जाऊन तळागाळात ते काम करतात, , गोरगरीब वंचित घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम वरिष्ठ रेड स्वस्तिकच्या पदाधिकारी यांच्यामार्फत करणार आहेत, आजच्या या वर्धापन दिनानिमित्त पूर्ण भारतातून रेड स्वस्तिकच्या शाखा उपलब्ध राहून त्यांनी वर्षभर केलेल्या आरोग्य सेवा असतील, मेडिकल कॅम्प असतील, ब्लड कॅम्प असतील जे जे सेवा केलेल्या आहेत त्या या पुरस्कार निमित्ताने मुंबई या ठिकाणी वर्धापन दिन दिनानिमित्त सादर केल्या जातात व ओडीसा, गुजरात, पंजाब, राजस्थान व इतर सर्व स्टेट मधून पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भामरे साहेब, कमलेश राक्षे साहेब, नंदू रायगुडे साहेब, नांदवळकर साहेब, डॉक्टर कोठारी, मुंबई हायकोर्टाचे ॲड नितीन राजगुरू आदी पदाधिकारी उपस्थित होते.