
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):इंदापूर तालुक्यातील काटी गावामध्ये भरतवाडी फाउंडेशनच्या वतीने संक्रातीचा वाण सावित्री माझी महान असा अनोखा उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श घालून दिला आहे. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही संक्राती दिवशी साजरी करून सर्व महिलांना संक्रातीचे वाण म्हणून सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित शंभर महिलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांना आदर्श शिक्षिका रोहिणी मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आधुनिक काळात सन ,उत्सव साजरे करत असताना महापुरुषांनी व महामातांनी घालून दिलेले सत्यशोधक व पुरोगामी विचार अमलात आणले पाहिजेत. ज्या पद्धतीने आपण पारंपरिक सण उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीने व त्याच निष्ठेने सावित्रीचे विचार सुद्धा आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.
ज्ञज्ञज्ञज्ञशिक्षण हा सर्व गोष्टींचा पाया आहे त्यामुळे आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी एक आई म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे व ती आपण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पुरोगामी विचार गरजेचे आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी फाउंडेशनच्या सदस्या सौ.नंदा दिनकर मोहिते व उपस्थित जेष्ठ महिलांच्या हस्ते सर्व महिलांना पुस्तके वाटप करण्यात आली.