
अन्यथा जिल्हा भर उग्र आंदोलन छेडण्यात येईल:-परमेश्वर पाटील भिमलवाड…
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/मुदखेड :-मुदखेड तालुक्यातील मौजे रोही पिंपळगाव येथील सहा वर्षांची चिमुकली प्रिया निरंजन शिंदे या छोट्या मुलीची दि.१५ जानेवारी २०२४ रोजी अमानुष अत्याचार करुन हत्या करण्यात आली .हि घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून लवकरात लवकर आरोपींना अटक करुन भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भिमलवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की देशात कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित भारत म्हणून होत असलेल्या पैसा ची उधळपट्टी थांबवून महिला सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत शासनाने मतांचं राजकारण न करता जनतेच्या हितासाठी कार्य केले पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा तुमचे देशात फिरणे कठिण होईल
खरच आपण विकसित आहोत का याचा विचार केला पाहिजे आज आपली चिमुकली प्रिया आपल्या मध्ये नाही हेच आहे का विकसित भारत देशभर महिला व बालीका यांच्या अमानुष अत्याचार होत आहे.आम्हाला महिला व छोट्या मुलींवर अत्याचार करणारा विकसित भारत नको आहे आमची माता, बहिण, देशातील छोट्या मुली सुरक्षीत ठेवणारा देश हवा आहे.
शासनाने आरोपींना फाशी न दिल्यास आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने जिल्हा भर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरकारला दिला आहे.