
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- केंद्रीय वित्त विभागाने
कर्मचाऱ्यांच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष मा. विठ्ठलभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडचे मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी- मा. विजय अवधाने यांना देण्यात आले आहे.
केंद्रिय वित्त विभागाचे वित्तमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांना
महिती होण्यासाठी नांदेडचे मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी- मा.
विजय अवधाने यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडच्या वतीने
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १०-१२ वर्षा पासुन
कर सवलतीच्या मर्यादेमध्ये भारत सरकारने कुठलाही बदल केलेला
नाही. परंतु महागाईच्या निर्देशंकानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात
भत्तावाढ होत आहे. त्याच प्रमाणात आयकर कराची पण वाढ होत
आहे. म्हणजेच कर्मचान्यांना महागाई निर्देशंकानुसार भत्ता जरी वाढला
असला तरी त्याचा उपयोग कर्मचाऱ्यांना होत नाही. यामुळे
कर्मचान्यांना मिळणाऱ्या एकूण १२ महिण्याच्या वेतनातुन जवळपास
०२ महिन्याचे वेतन आयकर खाते जमा करावे लागते. अर्थात १२
महिने काम करून कर्मचाऱ्यांच्या पदरी १० महिन्याचेच वेतन पडत
असल्यामुळे हा एक प्रकारचा अन्याय सरकार आमच्यावर करत आहे
हे आमचे म्हणणे आहे. त्या करीता या निवेदनात म्हटल्या प्रमाणे केद्रिय
वित्त मंत्री यांनी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा १२ लाखापर्यंत वाढवावी. या
वाढीमुळे कर्मचान्यांना १२ महिने काम केल्याचा मोबदला मिळेल अशी
या निवेदनात विनंती करण्यात आली असून येत्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनात करमुक्त उत्पन्नाची वाढ करण्यात यावी आणि
कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे अन्यथा आम्ही शिक्षक सेनेसह
सर्व शासकीय आणि निम शासकिय कर्मचारी संघटनेच्या वतीने
सरकारच्या विरोधात निदर्शने, संप व कामबंद आंदोलन करणार आहोत
याची नोंद घ्यावी असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- मा. विठ्ठलभाऊ
चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष- मा. संतोष आंबुलगेकर
, खाजगी शाळांचे जिल्हाध्यक्ष- मा. तानाजी पवार, खाजगी
जिल्हा सरचिटणीस- परशुराम येसलवाड, जिल्हा परिषद जिल्हा
सरचिटणीस- रवींद्र बडेवार, प्रसिद्धी प्रमुख- राजेश पवार जकापूरकर,
शहर अध्यक्ष- वसंत सिरसाट, तालुका अध्यक्ष- प्रकाश फुलवरे, व
भीमराव सकनुरे आदींची उपस्थिती होती.