
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
वैष्णव संस्कृती- २०२४ दिनदर्शिकेचे उत्साहात विमोचन
वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य ) तर्फे “वैष्णव संस्कृती 2024” या दिनदर्शिकेचे विमोचन आंबेजोगाई केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा.सौ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी सहकार्य केल्याबद्दल वैष्णव बैरागी विकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अशोकदासजी वैष्णव तसेच सचिव श्री.भानुदासजी (बंटी) बैरागी यांचे आभार त्यांनी मानले.
आंबेजोगाई येथे या कार्यक्रमासाठी बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री.अभिमन्यूजी वैष्णव बीड जिल्हा अध्यक्ष दिपकजी वैष्णव ,पत्रकार बालाजी वैष्णव, अमोल वैष्णव व ईतर मान्यवर उपस्थित होते.