
दै चालु वार्ता प्रतिनिधी: बद्रीनारायण घुगे पुणे /देहूगाव :
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या अकरा दिवसांवर येऊन ठेपला आहे.देहूगाव मुख्य कमानी पासून ते देहूगाव तालीम , ते चौदा टाळकरी कमान ,तसेच वैकुंठस्थान मंदिर ते वडाचा माळ ,आणि वडाचा माळ ते संत तुकाराम विद्यालय दरम्यान रस्त्याचा दुतर्फा लाखो रुपये खर्च करून पादचारी मार्ग बनविले आहेत.
परंतु या पादचारी मार्गावर अनेक दुकानदारांनी पादचारी मार्गावर दुकानात विक्री साठी असलेले साहित्य ठेवले आहे.काहींनी लोखंडी जिने उभे केले आहेत.अनेक भाजीपाला विक्रेते बसलेले असतात.त्यामुळे वयोवृद्ध नागरींक ,महिला विध्यार्थी ,वारकरी भाविक भक्तांना रस्त्यावरून चालताना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.नगर पंचायत लाखो रुपये हे अतिक्रमण हटविण्यासाठी खर्च करीत आहे.परंतु पुन्हा अतिक्रमण होत असल्याने हा खर्च वायाला जात आहे.
नगर पंचायतीची अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणजे चार अण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असा प्रकार आहे.अतिक्रमण विरोधी कारवाई करून कायम स्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी देहूचे ग्रामस्थ करू लागले आहेत.
*बेशिस्त वाहन पार्किंग ,पोलिसांचे दुर्लक्ष*
याच भागात अनेक दुकाने असून पार्किंगची सोय नसल्याने ,अनेक वाहने दुकाना समोर लावली जाता असल्याने रस्ता अरुंद झाल्याने दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.हा रस्ता अत्यन्त वर्दळीचा असून , रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त वाहने पार्किंग केली जातात. वाहतूक पोलीस विभागाने वाहन पार्कींगचे त्वरित सम विषम तारखेचे मार्गदर्शक बोर्ड लावून वाहतूक कोंडी होणार नाही या बाबत दक्षता घेणे आवश्यक असून या बाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ तसेच भाविक भक्त करू लागले आहेत.