
दै चालु वार्ता प्रतिनिधी,पुणे/पिंपरी चिंचवड:बद्रीनारायण घुगे
कामगारांच्या अनेक समस्या असतात अनेक कामगारांना कंपनीच्या वतीने इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम मिळत नाही त्यामुळे अशा कामगार किंवा कामगारांच्या घरातील व्यक्ती आजारी पडल्यानंतर दवाखान्याचे येणारे बिल सर्वसामान्य कामगार भरू शकत नाही. अशा कामगारांसाठी मी मेडिक्लेम पॉलिसी सुद्धा काढून देणार आहे. कामगारांची कोणतीही समस्या मला कळवावी ती सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असेल असे आश्वासन जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांनी राष्ट्रवादी कामगार सेल देहू शहर कामगार कुटुंब स्नेह मेळाव्यात दिले.
या मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम, देहूच्या नगराध्यक्ष पूजाताई दिवटे, देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विवेक काळोखे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ.रेश्मा ताई मोरे राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष नितीन जाधव, आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यामध्ये कामगार जीवन आणि वास्तव या विषयावर प्रा. प्रदीप कदम यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. प्रदीप कदम यांनी आपल्या व्याख्यानातून कामगारांच्या जीवनात येणारे प्रसंग, कामगार संघर्ष, येणारे नैराश्य आणि व्यसन अशा मुद्द्यावर उपस्थितांना प्रबोधन केले.
यावेळी अनिल देसाई प्रस्तुत खेळ पैठणीचा क्षण आनंदाचा हा महिलांसाठी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. कामगारांच्या मुलांसाठी बालजत्रेचेही आयोजन करण्यात आले होते.
अशा भरगच्च कार्यक्रमात आमदार सुनील आण्णा शेळके आणि सारिका ताई शेळके यांचा सपत्नीक देहू शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कला, क्रीडा, सामाजिक सांस्कृतीक, अध्यात्मिक, शिक्षण आरोग्य अशा क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा
गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सुनिल आण्णा शेळके यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सारिका ताई शेळके यांच्या शुभहस्ते कामगार वर्गातील महिलांचा युवा उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मान झाला.
सौ प्रियांका सागर केवटया मानाच्या पैठणी आणि वॉशिंग मशीनच्या मानकरी ठरल्या.तसेच महिलांना फ्रिज, एक्वागार्ड ओव्हन, गॅस शेगडी अशी लकी ड्रॉ ची बक्षिसे सौ सारिकाताई शेळके यांच्या शुभहस्ते देण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी देहू चे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे अनिकेत काळोखे, नितीन जाधव, वैभव पवार, रमेश चव्हाण,सरदार गावडे,रवी कनेरकर, नवनाथ जाधव, विनायक चव्हाण, आकाश डोंगरे, धनाजीराव जाधव, यशवंत आवळे, अनिल शेलार, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव पवार, आभार नितीन जाधव,रमेश चव्हाण तर सूत्रसंचालन बी के कोकाटे सर यांनी केले.