
समाधान वाघ
गावची भिलाटी (आदिवासी वस्ती ) घरात दारू विकणे आणि दारू पिण्यासाठी ज्या घरात रात्रंदिवस लोकांची गर्दी होते अशा ठिकाणी अभ्यास कऱण्याचं मन तरी कसं होईल असा साधा विचार मनात केला तरी अंगावर काटा येतो. मात्र अशाच हालाकीच्या परिस्थितीवर मात देऊन डॉ. राजेंद्र भारूड यांनी UPSC परीक्षेत अव्वल यश मिळवलं होतं. त्यांचा IAS चा प्रवास नुकसता प्रेरणादायीच नाही तर कठीण परिस्थितीवर मात करून अशक्य ते शक्य कसं करायचं हा सांगणारा आहे. धुळ्यात राजेंद्र भारूड यांचा जन्म झाला. जन्मा आधीच वडिलांचा मृत्यू झाल्यानं राजेंद्र यांच्या आईला गर्भ पाडण्यासाठी पिच्छा पुरवला पण आईनं मुलाला जन्म देण्याचा ठाम निश्चय केला आणि राजेंद्र यांचा जन्म झाला. घरी अठराविश्व दारिद्र्य आणि तीन मुलांचा सांभाळ करणं हे माऊली समोर आव्हान होतं. आदिवासी समुदायात उदर्निवाहासाठी दारू तयार करून विकणं हे त्यावेळी पैसे मिळवण्याचं साधन होतं. त्यामुळे आई दारू तयार करून विकत असे. ज्या वयात मूल रडल्यानंतर दुधाची गरज होती तिथे तीनं आम्हाला दारूचे तीन थेंब पाजून झोपवत होती. असं भारूड सांगतात
ते घराबाहेरील प्लॅटफॉर्मवर बसून अभ्यास करत . काही वेळा दारू पिण्यासाठी आलेले लोक त्यांना फराळ आणण्यासाठी काही जास्तीचे पैसे देत असत. त्यातून त्यांनी 10 वी ची काही पुस्तके खरेदी केली. कठोर अभ्यास केला आणि इयत्ता 10वीच्या परीक्षेत 95% मिळवले आणि 12वीत 90% मिळवले.
12 वी नंतर त्यांनी अथक परिश्रमाणे त्यांनी एमबीबीएस ला प्रवेश मिळवला.
एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देण्याचा डॉ. भारुड यांनी निर्णय घेतला. तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक होता. याचं कारण, म्हणजे ते इंटर्न असताना एकाच वेळी दोन परीक्षांची तयारी करत होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे युपीएससीची परीक्षा जिची ओळख ही देशातली सर्वात अवघड परीक्षा मानली जाते ती त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केली. सहाजिकच, त्यांच्या आईला युपीएससीच्या परीक्षेबद्दल कसलीही माहिती नव्हती. शिक्षण पुर्ण केल्यानंतर जेव्हा डॉ. राजेंद्र भारुड घरी आले तेव्हा त्यांच्या आईला खुप आनंद झाला होता.*डॉ. राजेंद्र भारूड म्हणतात की
“मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं”.
त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांना आयपीएस अधिकारी पद मिळाले. पण राजेंद्रला सुरुवातीपासूनच आयएएस अधिकारी व्हायचे होते, त्यामुळे त्यांनी पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली आणि यावेळी ते आयएएस झाले. ते 2013 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत.
त्यांचा हा प्रवास स्वप्न हरवून बसलेल्यांसाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे…
राजेंद्र भारूड हे भिल्ल समाजातील पहिले आयएस ऑफिसर आहेत