
दैनिक चालुवार्ता
प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
*गंगाखेड*:तालुक्यातील मौजे धारासुर येथे अकराव्या शतकातील प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर प्राचीन ऐतिहासिक मंदिरापैकी शिखर अस्तित्वात असलेले एकमेव गुप्तेश्वर मंदिर आहे.
या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून या मंदिराचे शिखर जशास तसे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सवानी व्हेरिटेज कंपनी मुंबई यांनी गुप्तेश्वर मंदिराचे प्राचीन शिखर जतन ठेवण्यासाठी कट करून मंदिर उतरण्याचा भारतातील पहिला प्रयोग बुधवार दिनांक १९ जून २०२४ रोजी पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन नांदेड यांच्या वतीने विलास वाहने सहाय्यक संचालक पुणे व रत्नागिरी सवानी हेरिटेज कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर जशासतसे खाली उतरविण्याचा प्रयोग यशस्वी झाला.