
दै चालु वार्ता प्रतिनिधीपुणे/पिंपरी चिंचवड :बद्रीनारायण घुगे
वटसावित्री पौर्णिमा दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करण्याची भारतीय संस्कृती आहे. या सणाला पर्यावरणाशी जोडण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने मागील काही सालापासून वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडांचे पूजन करण्यासोबत वडाच्या झाडाची लागवड महिलांनी करावी, अशी संकल्पना मांडून हा उपक्रम मागील काही वर्षांपूर्वी सुरू केला. शुक्रवारी देहू नगरपंचायतने शहरात अनेक ठिकाणी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडांची लागवड करून अनोख्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या शिवाजी महाराज मोरे पुढाकार घेतला. वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्थाकाही वर्षांपासून देहू शहरात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिष्ठानने आजवर अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून वृक्षांची चळवळ घराघरात नेण्यासाठी प्रयत्न केला असुन
शहरातत्या त्या भागात प्रत्येकी पाच झाडांची लागवड करण्यात आली. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी फक्त देशी झाडांचीच लागवड करण्यात आली. त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, उंबर यांसह अन्य देशी झाडांचा समावेश आहे. हवा शुद्ध करून ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढविण्यामध्ये देशी वडाचे झाडांचा उपयोग होतो. त्यामुळे देशी झाडे लावण्यात आले. तसेच या झाडांची लागवड करून संगोपन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आहे यावेळी नगरपंचायतने मुख्याधिकारी निवेदिता घार्गे नगराध्यक्षा, पुजा दिवटे नगरसेवक प्राजक्ता रुद्रवार वैशाली पाटील वैष्णवी पाटील जयंती गाडगीळ माल्लीका श्यामसुंदर प्रवीण काळोखे मयुर शिवशरण प्रदीप परंडवाल योगेश काळोखे प्रविण काळोखे सागर भसे देहूनगरपंचायतचे बांधकाम अधिकारी संगपाल गायकवाड. रोकडे आंधळे. सर्व कर्मचारी ग्रामस्थ वसुंधरा चे ह भ प शिवाजी महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.