
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
ब्रह्माकुमारी शाखा हिरपूर च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस दि .२१ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
योग दिवसाचे खास महत्त्व आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजर केला जातो.
या वर्षीची थिम “महिला सक्षमीकरण” यावर आधारित होती. यावेळेस योगशिक्षक विलास नसले यांनी सर्वांकडून योगासने करून घेतली व त्याचे महत्त्व सुद्धा सांगितले. यावेळेस मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण ढगे यांनी तर आभार प्रदर्शन सोपानभाई यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता स्वातीताई राजगुरे, सीतामाता गुल्हाने, सविता भालेराव, छायाताई गावंडे, गजाननभाई , सुयोग वह्रेकर, भगवानराव गुल्हाने, ज्ञानेश्वरराव गुल्हाने, विनोद पांडे, गोपाल हेमने यांनी परिश्रम घेतले.