
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : 21 जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो.वाघोली येथील स्नेहालय अस्थिव्यांग मुलांचे निवासी संस्थेत, 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये स्नेहालय संस्थेतील दिव्यांग मुले, कर्मचारी वर्ग, फादर्स, सिस्टर्स तसेच ढोले पाटील कॉलेजमधील द्वितीय व शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी सहभागी होते. स्नेहालय संस्थेचे संचालक आदरणीय फादर सनी जोसेफ यांनी निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे, तसेच दररोज योगा केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. अशा प्रकारे योगाचे फायदे सांगून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ढोले पाटील कॉलेज फिजिओथेरपी डिपार्टमेंटचे प्रिन्सिपल डॉक्टर एन गुणसेकरन व प्रिन्सिपल डॉक्टर लोकेश आर यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सरगम जयस्वाल यांनी वेगवेगळ्या आसने सूर्यनमस्कार, प्राणायाम, इत्यादीचे प्रात्येक्षिक दाखवून सर्वांना सहभागी करून घेतले. संस्थेतील दिव्यांग मुलेही यामध्ये आनंदाने सहभागी झाली.
या कार्यक्रमाचे नियोजन स्नेहालय संस्थेतील फिजियोथेरपीस्ट डॉक्टर मॅथ्यू येशूदास व शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर सुबोध बारला यांनी केले.