
दै चालु वार्ता प्रतिनिधीपुणे / पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील प्रत्येक मुलांना वाहया पुस्तके कंपास पेन्सिल पेन शॉपनर चित्रकलेच्या वह्या पाण्याची बॉटल जेवणाचा डबा खेळण्याचे साहित्य त्यामध्ये कॅरम बॉल बॅट रंगपेटी संपूर्ण कीट देण्यात आले एक वर्षभर पुरेल एवढे पेन पेन्सिल व स्टेशनरी मुलांना वाटप करण्यात आले आहे
ज्या व्यक्तींनी दिली त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवण्यासाठी सांगितले आहे त्यांनी त्यांच्या भाषणांमधून सांगितलं की आम्ही जे दान देतो त्याचा कोठेही उल्लेख झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी व श्रीरामकृष्ण अनाथ आश्रम मरकळ या संस्थेतील मुलांना लागणारे सर्व शालेय साहित्य वाटप केले श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था गेली पंचवीस वर्षापासून आळंदी मध्ये गरीब गरजू कष्टकरी शेतकरी अनाथ मुलांचे पालन पोषण करत आहे त्याचबरोबर त्यांचा शालेय शिक्षण देण्याचे काम सतत चालू आहे संस्थेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात सर्व संतांच्या पुण्यतिथीच्या व महापुरुषांच्या साजरा केला जातात त्यानिमित्ताने आपले संस्कृती या मुलांना कळावी व आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालत राहावा या शुद्ध हेतूने संस्था अनेक शहरांमध्ये अनेक भागांमध्ये मग व्यसनमुक्ती असो किंवा आरोग्य शिबिरासह संस्कार शिबिर असो असे अनेक प्रकारचे कार्य संस्थेच्या अध्यक्ष मोहन महाराज शिंदे व उपाध्यक्ष विलास तात्या बालवडकर व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून हे कार्य सुरू आहे हे कार्य करत असताना संस्थेला अनेक काम करायचे आहेत त्यासाठी दानशूर व्यक्तीने हे कार्य अखंड चालू राहण्यासाठी या धर्म कार्यामध्ये सहकार्याची अपेक्षा आहे आपल्या सहकार्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि आपण सहकार्य करणार त्या सहकार्यातून अनेक मुलं घडवण्याचं काम केलं जाईल व अनेक मुलांना त्याचा आपल्या दानाचा फायदा होणार आहे कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे पत्रकार अर्जुन मेदनकर एम डी पाखरे रामचंद्र सारंग कृष्णा कोलते कदम काका इत्यादी मान्यवर उपस्थित होते