
दै. चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे-
वैजापूर -पंढरपूर येथे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन २४ तास घेता येणार आहे.
२६ जुलैपर्यंत विठ्ठलाचं मंदिर २४ तास सुरू असणार असल्याचा निर्णय विठ्ठल मंदिर ट्रस्टने घेतला आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना लवकरच विठ्ठलाच्या पूजेचं निमंत्रण दिलं जाणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या भक्तीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा एक सुवर्णसंधी असेल.