
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानांतर्गत अभियंता भवन अमरावती येथे राष्ट्रनिर्माता सन्मान सोहळा नुकताच पार पडला . सौ प्रमिला भास्करराव आखरे विषय शिक्षक ह्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गुरुदेव नगर,मोझरी येथे कार्यरत आहेत .
सौ प्रमिला आखरे यांनी उत्कृष्टपणे शैक्षणिक सामाजिक व प्रशासकीय कार्यात सहभाग देऊन विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले . शाल श्रीफळ प्रशस्ती पत्र देऊन अध्यक्ष विजय ठाकूर; कर्सर संतोष बोरकर ; प्राध्यापक सुजाता गोरखेडे सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ कर्नाटक ;ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गोविंदराव कासट ; सन्मान सामाजिक कार्यकर्ता गुंजन ताई घोडे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला .