
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
राजर्षी शाहू महाराज जयंती आळंदी नगरपरिषद मध्ये साजरी करण्यात आली यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले आळंदी नगरपरिषद चे मुख्याधिकारी कैलास केंद्र यया हस्ते करण्यात आले असून त्यांनी राजर्षी शाहू महाराज बद्दल प्रतिपादन केले या मध्ये राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते
आले यावेळी आळंदी नगरपरिषद सर्व कर्मचारी सचिन गायकवाड शितल जाधव संतोष गाडेकर योगिता कुऱ्हाडे शिवशरण सर उपस्थित होते