
जालना प्रतिनिधी आकाश माने
जालना -शहरातील अंबिका पेंट या रंग विक्रीच्या दुकानाचे मालक राकेश प्रकाशभाई मेहता वय 52 वर्ष, हे व्यापारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी जात असताना काही कामानिमित्त जुना मोंढा येथील एका दुकानांमध्ये काही मिनिटांसाठी थांबले होते. तेवढ्यात तिथे डोक्याला हेल्मेट घातलेले दोन तरुण आले आणि अवघ्या एका मिनिटांमध्ये राकेश मेहता यांच्या स्कुटीच्या डिक्कीतील दीड लाख रुपयांची बॅग लंपास केली. कुठलेही कुलूप न तोडता बे मालूमपणे हा प्रकार घडला होता .त्यानंतर मेहता यांनी घरी जाऊन बॅग काढण्यासाठी डिक्की उघडली असता बॅगच नसल्याचे लक्षात आले आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली. एका मिनिटात आणि किती बेमालूनपणे सीट खाली असलेल्या डिक्कीतून बॅग पळवतात हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा