
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
तालुक्यातील आरोग्यवर्धीनी केंद्र पोहा येथे संशयीत क्षय रुग्ण तपासणी शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .पांडूरंग ठोंबरे; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील कावरखे; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनात वैद्यकीय अधीकारी डॉ सतीष परभणकर; तालुका आरोग्य अधिकारी डॉ . शंकर नांदे; पोहा काजळेश्वर केंद्राचे वैद्यकीय अधीकारी डॉ प्रशांत वाघमारे; डॉ सोनाली पोले यांचे उपस्थीतीत दि २६ जून रोजी घेण्यात आले .
संशयीत ५३ रुग्नांचे एक्स रे वैज्ञानिक अधीकारी वैभव रोडे फार्मसी अधीकारी आरती उगले; प्रयोगशाळा वैज्ञानीक अनिरुद्ध डेरे; आरोग्य सहाय्यक आत्माराम सोनोने; गजानन देशमुख; अनीता मोघाड इत्यादींनी केले . शिबीर यशस्वी करण्यास आरोग्य सेवक किशोर पदलमवार ;रामकृष्ण चोखारे; कैलास पा उपाध्ये यांचे सह देवीचंद राठोड; माधुरी बुधनेर ; किरण तीरोकार गट प्रवर्तक; आशा कार्यकर्ता इत्यादींनी प्रयत्न केले . संशयीत रुग्णांना औषधोपचार देण्यात आला . यावेळी क्षयरोगा सोबतच एडस; डेंग्यू; ऍडल्ट बीसीजी लसीकरणाबाबत उपस्थीतांना आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबीराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र यांनी केले होते .