
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
कारंजा पंचायत समीती सभागृहात सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या खाजगी अनुदानीत ; ; विना अनुदानीत; अल्पसंख्यांक; स्वयं अर्थसहाय्य ; जील्हा परीषद नगर परीषद शाळांच्या मुख्याधापकांची सहविचार सभा शाळा पुर्व तयारी करीता बुधवारी दि .२६ जून रोजी गटविकास अधीकारी श्रीमती पुनम भगवान राणे यांचे अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांचे मार्गदर्शनात घेण्यात आली .
सर्वप्रथम छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन व हारार्पन गटविकासअधिकारी श्रीमती राणे; गटशिक्षणाधिकारी श्रीकांत राणे तथा मान्यवरांनी करून त्यांना अभिवादन केले . सभेला उपस्थीत मुख्याधापकांना मार्गदर्शन करतांना गटशिक्षनाधीकारी श्रीकांत माने यांनी नव प्रवेशीत व उपस्थीत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांना गणवेश; बूट सॉक्स; मध्यान्ह भोजन योजनेनुसार गोड भाता सह आनंददायी पध्दतीने शिक्षण द्यावे . शाळेत विवीध उपक्रम राबऊन गुणवत्ता वाढीकरीता शिक्षकांनी प्रयत्न करावेत . यासोबतच यु डायस प्लस स्टुडन्ट पोर्टल; दिव्यांग विद्यार्थी; सुंदर माझी शाळा अभियान राबविण्या बाबत मार्गदर्शन केले . कारंजा तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता दजेदार ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनी लक्ष केंद्रीत करावे अशी सूचना गटविकास अधीकारी श्रीमती पुनम राणे मॅडम यांनी केली . सभेला गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्तीनी सहकार्य दिले .