
दै. चालू वार्ता, पैठण प्रतिनिधी,
तुषार नाटकर-
पैठण : लोकसभेची जागा जिंकल्यावर महाविकास आघाडीला विधानसभेचे वेध लागले असुन पैठण मधुन खासदार डॉ. कल्याण काळे यांना जवळपास तीस हजार मताची आघाडी मिळाली याच मतांच्या जोरावर आता महाविकास आघाडीतील कॉग्रेस पक्ष आता पैठण विधानसभाच्या जागेवर दावा करत असुन पक्षाच्या झालेल्या बैठकीत पैठण विधानसभेची जागा ओ.बि.सी.ला सोडण्यात यावी व कॉंग्रेस पक्षाकडून पैठण विधानसभा साठी ओ.बी.सी.च्या माध्यमातून विधानसभेसाठी ओ.बी.सी मराठवाडा विभाग अध्यक्ष कांचनकुमार चाटे हे ईच्छुक असुन विधानसभेच्या निवडणूकी साठी आपण या आधी ही पैठण तालुक्यातील गावात जनसंपर्क साधला आहे. कॉंग्रेसने जर मला ओ.बी.सी.च्या माध्यमातून विधानसभा निवडणुक लढवण्याची संधी द्यावी, नक्कीच मी या संधीचे सोनं करील असा विश्वास कांचनकुमार चाटे यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केला.