
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
जिल्हा आपत्ती व्यवस्थापण; राष्ट्रीय आपत्ती दल व तहसील कार्यालय कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने दि २६ जून रोजी कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प पिंप्री फॉरेस्ट येथे पूर परीस्तीती व आपत्ती चे व्यवस्थापण करण्या हेतू एक दिवशीय प्रशिक्षण आयोजीत होते
प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे तर प्रमुख उपस्थीतीत तहसीलदार कुणाल झाल्टे; नायब तहसीलदार हरणे शिंदे; तालूका कृषी अधीकारी जटाळे मापती प्रतीसाद दलाचे पोलीस निरीक्षक ब्रिजेश कुमार यादव; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधीकारी शाहू भगत सहाय्यक पोलीसउपनिरीक्षक बी. के . जैस्वाल; सहाय्यक गटविकास अधीकारी कैलासराव घुगे; सास प्रमुख श्याम सवाई; रमेश देशमुख इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते .
पूर परीस्थीती; सर्पदंश; आग लागल्यास तथा कोणतीही आपत्ती लक्षात येताच कोणती उपाय योजना करावी; कुणाचे सहाय्य घ्यावे;मनुष्य प्राणी तसेच मालमत्तेचे निर्माण झालेल्या आपत्तीतून शोध व बचाव कार्य करण्यासाठी तहसीलदार कुणाल झाल्टे; शाहू भगत; एनडीआर एफ चे ब्रिजेश कुमार; जयस्वाल श्याम सवाई; एडीओ कैलास देवरे यांनी सविस्तर शिबीरात मार्गदर्शन केले . या वेळी तालुक्यातील सरपंच ;पोलीस पाटील; तलाठी ; मंडळ अधीकारी ; कृषी सहाय्यक; ग्रामसेवक; पोलीस वर्ग;अंगणवाडी सेविका आशा वर्कर; स्वयंसेवी संस्था प्रतीनीधी मोठ्या संख्येने प्रशाक्षण शिबीर स्थळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाहू भगत आभार पुरस्कारप्राप्त आदर्श तलाठी राहूल वरघट यांनी केले .शिबीर यशस्वी करण्यास महसुल कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले .