
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :लाल बहादूर शास्त्री विद्यालयात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात सकाळी संस्था ध्वजारोहन ७:४० वाजता होईल.व नंतर लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील शालांत परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यी,स्पर्धा परिक्षेत व क्रीडा क्षेञात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे रघुकुल मंगल कार्यालयात दि.२८ शुक्रवार रोजी सकाळी ८:३० वाजता आयोजन केले आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मधुकरराव वट्टमवार तर प्रमूख अतिथी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व प्रमूख उपस्थिती शंकरराव लासुणे यांची असणार आहे.याशिवाय व्यंकटराव गुरमे,सतनप्पा हुरदळे ,अंजली नळगीरकर, षण्मुखानंद मठपती, डॉ.प्रशांत राजुरकर, अनंतराम कोपले, अंकुश मिरगुडे व श्रीपाद सिमंतकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.