आतापर्यंत १३ पतसंस्थांनी केला पोबारा
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/
सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा)
शहरासह तालुक्यांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात पतसंस्था स्थापन करण्यात आले आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून गरजूंना अल्प व सवलतीवर कर्ज सुविधा उपलब्ध करून त्यांना पाठबळ देण्यासाठी उभ्या राहिल्या . परंतु , मंठा शहरातील काही नवीन पतसंस्था आता डबघाईला आल्याचे दिसून येत असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर प्रतिनिधींना दिली आहे.
मंठा तालुक्यात आतापर्यंत अकरा ते बारा पतसंस्था बंद पडल्या असून काही सर्वसामान्यांचे पैसे घेऊन फरार झाले आहेत. कष्ट तरी सर्वसामान्य नागरिकासह व्यापारी व शेतकरी बांधव आपली कष्टाची मायापुंजी बँकेमध्ये जमा करतात. परंतु या पतसंस्था कोट्यावधीची मायापुंजी जमा करून सर्वसामान्यांना चुना लावून फरार होत आहेत.यामुळे पतसंस्थेत सर्वसामान्याचे पैसे सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. मंठा शहरातील काही पतसंस्थेमध्ये आज घडीला गैरव्यवहार होताना दिसून येत आहे. आजच्या दरम्यान प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपला गैरप्रकार लपवण्याचा प्रकार देखील पतसंस्थेकडून करण्यात येतो. पतसंस्थेकडून नियमबाह्य व कर्ज तसेच बचत गटांना देखील नियमबाह्य कर्ज तसेच शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त बचत गटांना कर्ज देण्यात येते. सदर पतसंस्थेमधील डिपॉझिट धारकांची मायापुजी स्वतःच्या फायद्यासाठी वापरताना काही पतसंस्था संचालक दिसून येत आहेत. त्यामुळे मंठा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकास शेतकरी कष्टकरी व्यापारी यांनी वेळी सावध होऊन आपली डिपॉझिट रक्कम सुरक्षित आहे का ? याची खात्री करून घ्यावी. नसता पुन्हा काही पतसंस्था चुना लावल्याशिवाय राहणार नाहीत.
शासनाने देखील या पतसंस्थेवर कडक निर्बंध व नियम आणून सर्वसामान्य कष्टकरी व व्यापारी शेतकऱ्यांची मायापुंजी सुरक्षित करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.