
दै.चालु वार्ता
चाकूर प्रतिनिधी किशन वडारे
चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथे शुक्रवारी (ता. २८) रोजी पहाटे चोरट्या टोळीने धाडसी चोरी करत सहा घरे फोडून १० तोळे सोने, १ किलो चांदीसह ९५ हजारांची रोकड लंपास केली आहे.राचन्नावाडी येथे दिड महिन्यात अशी दुसरी घटना घडली असल्याने नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वाढवणा पोलिसांनी पंचनामा करून ठसे तज्ञांना बोलावून गुन्हा दाखल केला.
राचन्नावाडी येथील सुर्यकांत राजाराम चिंचोळे व बालाजी भंडे या दोघांच्या घराचे कुलुप तोडून कपाटाचे लॉक मोडून चोरट्यांनी कानातील झुबे, बोरमाळ, मनी, चैन, अंगठी, चांदीचे शिक्के, वाळे असे १० तोळे सोने व एक किलो चांदी आणि ९५ हजारांची रोकड चोरली तर संपत मलिशे यांच्या घराचे कुलुप तोडले,गणपत चिंचोळे यांच्या घरातील कपाटाचे लॉक तोडले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले,अरविंद आवाळे यांचा दरवाजा तोडून कपाटाचे लॉक तोडून साड्या व इतर साहित्य टाकून झोपीत असलेल्या महिलेला बाहेरून कडी लावली, गावातील किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.एकाच रात्री अशी सहा घरे चोरट्या टोळीने फोडली असल्याने राचन्नावाडी व परीसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राचन्नावाडी येथे दिड महिन्यापुर्वीच चोरट्यांनी तातेराव वागलगावे यांचे घर फोडून दोन तोळे सोने व ५० हजार रुपये लंपास केले होते त्याच दिवशी इतर दोघांची घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता.ति घटना विसरी नाही तोपर्यंत ही चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे.चोरी झाली की पोलीस पंचनामा करुन गुन्ह�