
दै चालु वार्ता प्रतिनिधी शिंदखेडा
महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी विभागामार्फत लहान मुला मुलींना पौष्टिक आहार न देता अतिशय निकृष्ट दर्जेचे आहार वाटप करण्यात येत असून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यासाठी या गोष्टीचा विरोध म्हणून दी 29 जून रोजी तालुक्यातील गावांमध्ये अंगणवाडीत जाऊन आदिवासी टायगर सेनेने पोषण आहाराचा निषेध नोंदवला
संपूर्ण आहाराची चौकशी करून अंगणवाडी कर्मचारी यांना सांगितले की आपण कुठल्याही प्रकारचे आहाराचे किट लहान मुलांच्या पालकांना देऊ नये असे सांगण्यात आले व आलेला आहाराची किट शासनाला परत करावे असे देखील सांगण्यात आले..!तसेच अशा आहारामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.त्यामुळे या आहार पुरवठ्याची चौकशी करुन हा भ्रष्टाचार थांबवावा अशी तक्रार आदिवासी टायगर सेनेनी केली आहे.यावेळी लहान मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
तालुक्यातील धावडे, मालपूर, परसोळे, खर्दे, झोतवाडे, कर्ले, झिरवे इत्यादी गावात अंगणवाडीत जाऊन आदिवासी टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते म्हणून शासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात आणि बालकांना उत्तम दर्जाचा पोषण आहार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आदिवासी टायगर सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किशोर ठाकरे यांनी केली.
यावेळी तालुका अध्यक्ष कृष्णा मालचे,किशोर ठाकरे, विजय मालचे,तिरसिंग ठाकरे,विठ्ठल सोनवणे दिनेश सूर्यवंशी, रविंद्र सोनवणे, लालेश पवार,अंकूश पिंपळे आदीनी ठिकठिकाणी निषेध नोंदवले