
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी नांदेड दक्षिण गोविंद मोरे
नांदेड जिल्ह्यातील आपले आधी नसतं सर्व महसूल कर्मचाऱ्यांची बदली कायदा कलम तीन एक शासन परिपत्रक शासन निर्णयानुसार व परिशिष्ट एक मार्गदर्शक तत्वेनुसार बदली न करता निवेदनाचे उत्तर संधिग्द व दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे उत्तर दिल्या बाबत संदर्भात नमूद आपल्या कार्यालयास दिनांक.17 मे 2024 रोजी सादर केलेले निवेदन शाखा महसूल -1जा.क्र.2024/ मशाका-1/आस्था-1/टे-3/ प्र.क.17, दिनांक.06/06/2024 रोजीचे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांचे पत्र. शाखा- मुख्यमंत्री सचिवालय कक्ष,क्रमांक 2024/मु.म.स. कक्ष /कावी- 208, दिनांक.21/06/2024 रोजीचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नांदेड यांचे पत्र. संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की,मी दिनांक, 17/05/2024 रोजी आपल्या कार्यालयास व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, कार्यालय नांदेड महसूल कार्यालयातील महसूल सहाय्यक,अव्वल कारकून व वाहन चालक कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यानुसार माननीय निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड व पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नांदेड यांनी मला दोन वेगवेगळे पत्र दिले आहे सदर पत्रामध्ये एकाच अधिकाऱ्यांनी माजी दिशाभूल करण्यासाठी दोन वेगवेगळे प्रकारचे उत्तर दिले आहे. वास्तविक पाहता मी दिलेल्या निवेदनातील मागण्यांची बारकाईने,गांभीर्याने विषयाला न घेता थातूरमातूर उत्तर देऊन माझी दिशाभूल करून शासन नियमाचे उल्लंघन केले आहे.तसेच बदली अधिनियम कायदा 2005 नुसार,मार्गदर्शक तत्त्वानुसार दरवर्षी बदली होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची यादी जानेवारीपर्यंत मुख्यालय सादर केलेले दिसून येत नाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिनांक .31 जानेवारी पर्यंत बदलीस पात्र पकर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करून मार्च ते एप्रिल पर्यंत बदली करावयाचे बंधनकारक असताना देखील आज तागायत बदली करण्यात आलेली नाही परंतु दिनांक.06/05/2024 रोजी बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी आलेली दिसून येत आहे यावरून बदली संदर्भात आपले कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. तसेच महसूल सहाय्यक दोन पदावली पूर्ण केलेले अ.क्र.1 ते 79 कर्मचारी व एक पदावली पूर्ण केलेले महसूल सहाय्यक अ.क्र.1 ते 47 आणि बदलीस पात्र असलेले अव्वल कारकून अन.क्र. 1 ते 66 व दोन पदावली पूर्ण झालेले वाहन चालक अ..क्र.1 ते 5 व एक पदावली पूर्ण झालेले वाहन चालक अ.क्र.1 ते5 अशी दिनांक. 06/05/ 2024 रोजी ची यादी असतानाही याकडे निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून (बदली अधिनियम 2005 अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात) अशा प्रकारचे कायद्याला अनुसरून, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक.09/04/2018 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बदलीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली न करता बदली करण्यास माननीय निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांनी उदासीनता दाखवून माजी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रात दोन वेगवेगळे उत्तर देऊन माझी दिशाभूल केलेली आहे.व शासनाच्या नियमाचे भंग केला आहे. तरी माननीय साहेबांनी आपल्या कार्यालयात सादर केलेल्या बदली पात्र यादीचे तात्काळ अवलोकन करून जनतेचे,शेतकऱ्याचे काम सुलभपणे होण्याकरिता महसूल कर्मचाऱ्यांची बदली आपल्या स्तरावरून तात्काळ करून मला व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना,शेतकऱ्यांना बदली करून न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे बदलीस पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे