
अशोकराव उपाध्ये/ कारंजा लाड
वृक्षांचा संबंध पर्यावरण व पर्जन्यमानाशी असून, दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन व संगोपन करणे ही समाजातील सर्व घटकांची सामाजिक जबाबदारी आहे.
कारंजा येथे या जबाबदारीची सही सही प्रचिती जर कोणी आणून दिली असेल तर ती कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुरज खडके यांनी आणून दिली. हे सर्व सांगायला कारण म्हणजे श्री.खडके यांनी सामाजिक भान जपत आपल्या जवळचे पैसे खर्च करून शहरातील अनेकांना लागवडीसाठी वृक्ष मोफत दिले. ‘रफ अँड टफ’या ग्रुपच्या सहकार्याने सुरज खडके यांनी हा मोफत वृक्ष वाटप कार्यक्रम कारंजा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित केला होता. या कार्यक्रमातून खडके यांनी लागवड, संवर्धन आणि संगोपणाचा शब्द घेत अनेकांना वड,निंब,शीशम या वृक्षाचे वितरण केले. दरम्यान नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी पोलीस कर्मचारी खडके यांच्या या सामाजिक कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली. माजी नगराध्यक्ष संजय काकडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबणावळ,पत्रकार समीर देशपांडे ,संजय कडोळे ,शारदाताई भुयार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. समीर देशपांडे यांनी प्रसंगी बोलताना समाजात वृक्ष लागवडी विषयी जागरूकता निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तर संजय कडोळे म्हणाले की, इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून सुरज खडके यांच्या या सामाजिक कार्याची पोलीस खात्याने दखल घेऊन त्यांना सन्मानित केले पाहिजे. सुरज खडके यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, वृक्ष लागवड नि त्याचे संवर्धन व संगोपन हा माझ्या आवडीचा विषय आहे. या संदर्भाने मी समाजमाध्यमांवर सक्रिय होतो.कालांतराने आपण आवडीच्या विषयाला मूर्त रूप दिले पाहिजे असा विचार मनात आला आणि पुढे हा विचार मी खरा करून दाखवला. क्रीडा संकुलाच्या परिसरात होणारा वृक्ष लागवड आणि वितरणाचा कार्यक्रम हा मी माझे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याचे जिते जागते उदाहरण आहे.सूरज खडके पुढे म्हणाले की, पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याला जगण्यासाठी चांगल्या हवामानाची गरज असते. समाजातील सर्वांनी वृक्षारोपणाबरोबरच त्याचे संगोपन व संवर्धन करणे ही जबाबदारी घ्यावी कारण वृक्षांमुळे आपल्याला दुष्काळावरही मात करता येते. वृक्ष लागवड व संगोपन करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येतो. निसर्गाने आपल्याला बरेच काही दिले आहे.वृक्ष लागवड व संगोपन करून आपण त्याची परतफेड केली पाहिजे. प्रास्ताविक,संचालन व आभार प्रदर्शन श्याम सवाई यांनी केले. या कार्यक्रमाला कारंजा तालुका पत्रकार संघाचे सचिव ज्ञानेश्वर घुडे,पत्रकार बंडू इंगोले,सुनील फुलारी,पत्रकार अक्षय लोटे, धनंजय राठोड.’रफ अँड टफ’ ग्रुपचे शिवाजी गायकवाड, निलेश काळे,मुकेश राय,संदिप घमे,गिरीश जुमळे,आकाश कऱ्हे, नितिन तायडे,रोहित परकोटे,नितीन गढवाले,पोलिस कर्मचारी खोलेश्वर खुपसे, संदीप बर्डे, संतोष पाईकराव
पत्रकार बंडू इंगोले,सुनील फुलारी,पत्रकार अक्षय लोटे,पोलिस कर्मचारी खोलेश्वर खुपसे व सेवानिवृत्त ग्रंथपाल परमेश्वर व्यवहारे, प्रशांत दुर्गे आणि सामाजिक कार्यासाठी तत्पर शहरातील महिला सीमाताई सातपुते,शारदाताई भुयार,ज्योतीताई शेंडोकार कृपाताई ठाकरे उपस्थीत होत्या.