
दै. चालु वार्ता प्रतिनिधी पुणे / पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने देहू शहरातील महिला भगिनींसाठी मोफत शिवण क्लास आरी वर्क भय उद्घाटन दि. ६ रोजी अन्नपूर्णा बेकेट हॉल परंडवाल चौकात या ठिकाणी मावळचे लाडके आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या पत्नी सो सारिका सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण देहू शहर व परिसरातील महिलांची मोठी गर्दी झाली होती तसेच या कार्यक्रमासाठी कुलस्वामिनी महिला म्हणजे संस्थापिका सौ सारिका सुनील अण्णा शेळके यांना देहू नगरपंचायतचे नगराध्यक्षा सौ पुजा दिवटे व सर्व नगरसेविका हस्ते यांनी संत तुकाराम महाराज यांची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला
या महिला मंच कार्यक्रम सौ सारिका शेळके यांनी महिलांना मार्गदर्शन करताना बोलले की विविध योजना
राज्यातील महिला आणि मुलींचं आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना 1 जुलैपासून लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी केली
आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबामधील 18 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्या आधारे त्यांना स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविता यावा, यासाठी स्वयंसेवी संस्थामार्फत महिला प्रशिक्षण केंद्रे चालविण्यात येतात. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिवणकला, टंकलेखन, संगणक, स्क्रिन प्रिटींग, हस्तकला, अंगणवाडी, बालवाडी प्रशिक्षण इत्यादी प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. या केंद्रामध्ये प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना दरमहा विद्यावेतनही देण्यात येते. स्वयंसेवी संस्थेस प्रशिक्षण केंद्रासाठी यंत्रसामग्री व कार्यालयीन साहित्य खरेदीसाठी अनुदान देण्यात येते.
महिलांच्या विकासासाठी महिलांना माहिती उपलब्ध होण्याची व ती समजण्याची नितांत गरज असते. महिलांना आवश्यक तो सल्ला व मार्गदर्शन तसेच आपादग्रस्त महिलांना मदत मिळावी, यादृष्टीने राज्यात विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. हुंडा पद्धतीच्या निर्मुलनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती कार्यरत असते. जिल्हा परिषदेत महिला व बाल कल्याण समिती स्थापन करून त्या समितीमार्फत महिला व बाल विकासाची विविध कामे करण्यासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान दिले जाते. तसेच जिल्हा परिषदेमार्फतही त्यांच्या स्वत:च्या उत्पन्नातून 10 टक्के रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. त्याशिवाय जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या तरतुदीतूनही या समितीस अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.
महिला समुपदेशन केंद्र योजना 1994 मध्ये सुरु झाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने प्रामुख्याने ज्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली आहे. सध्या राज्यात 105 समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. असे प्रतिपादन केले
या कार्यक्रमाचे आयोजन कुलस्वामिनी महिला मंच मावळ व देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विवेक काळोखे यांनी केलेया वेळी स्मिता चव्हाण रसिका काळोखे पौर्णिमा परदेशी पूनम काळोखे सपना मोरे पूजा काळोखे प्रियंका मोरे ज्योती टिळेकर तसेच नगरसेवक योगेश काळोखे प्रविण काळोखे योगेश परंडवाल आदित्य टिळेकर स्वप्निल काळोखे प्रदिप परंडवाल मयुर शिवशरण सुर्दशन काळोखे मयुर गायकवाड प्रय्नय काळोखे उपस्थित होते महिलांनी नंतर जेवनाचा आस्वाद घेतला