
दै. चालु वार्ता रोहा प्रतिनिधी अजय परदेशी
कोलाड – रोहा मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी गुरांचा सुळसुळाट आहे ही गुरे नेहमीच सकाळी , संध्याकाळी रस्त्यावर घोळक्याने बसलेली असल्याने यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने यावर काही तरी उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालक आणि नागरिक करत आहेत.
सध्या पावसाळा सुरवात झाल्याने चिखल, माशांचा त्रास सुरू होत असून अनेक मोकाट गुरे डांबरी, सिमेंट रस्त्यावर ठान मांडून बसतात कारण थोडा वेळ पाऊस थांबला की डांबरी व सिमेंट रस्ता सुकतो ग्रामीण परिसरात शेतकरी पशुधन पालन असून पूर्वीसारखीच काळजी घेऊन त्यांची निगा सुद्धा राखली जात आहे कोलाड – रोहा मुख्य रस्त्यावर आंबेवाडी, पाले बुद्रुक , पाले खुर्द, संभे या भागात गुरांचे कळप रस्त्यावर बसलेले असतात अनेक ठिकाणी तर रस्त्यावर ठाण मांडतात यामुळे दुचाकी, मोठे वाहन यांचे किरकोळ अपघात होत आहेत अपघात झाल्यावर गुरे दगवल्यावर गुरे मालक येऊन पैसे मागतात काही वेळा पोलिस ठाण्यात हे प्रकार जाऊन वाहन चालकांना त्रास दायक ठरत आहेत यासाठी ठोस उपाययोजना करून मोकाट गुरांचा त्रासापासून सुटका करावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत
*बदलत्या जीवन शैलीचा परिणाम.*
सध्या जीवनमान बदलले असून आधुनिक यांत्रिक साधने आली आहेत शेतीसाठी बैलजोडीचा वापर न करता ट्रॅक्टर आले त्यामुळे गुरे पाळणे कठीण झाले आहे त्यात गुरे चाराई क्षेत्र कमी झाले वनविभागातर्फे अनेक वण पट्टे शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी वापरास दिल्याने गुरांना चारा क्षेत्राची कमतरता भासू लागली सध्या फक्त शेत कामाला लागणारे बैल पाळले जात असून बाकी पशुधन पाळणे कमी झाले आहे . सध्या वन चाराई जागा कमी झाली आहे औद्योगिक करण झाल्याने पूर्वी सारखे पशुपालन कमी झाले ज्यांच्याकडे आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे रस्त्यावर मोकाट सोडू नये यामुळे वाहन चालकांचे अपघात होत आहेत…
(रुपेश लोखंडे,आंबेवाडी)
आंबेवाडी परिसरात ग्रामपंचायत कर्मचारी दिवसा रस्त्यावरील मोकाट गुरांना हकलू शकतात पण रात्रीचा वेळी मोठी समस्या आहे पूर्वी कोंडवाडा असायचा त्यातही ही मोकाट गुरे टाकण्याच्या , दंडाच्या भीतीने गुरे मालक घाबरत होते . परंतु आता गुरे मालक गुरे मोकाट सोडतात त्यांना विनंती आहे मोकाट गुरे घरी न्यावीत…