
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
(पुणे) वाघोली : ज्या शाळेत शिकलो आणि ज्या शिक्षणाच्या जोरावर मोठमोठ्या पदावर विराजमान झालो, ती शाळा कधी विसरायची नसते. जर पुन्हा शाळेत जायची वेळ आली किंवा योग आला तर जायचं असतं, आणि ह्याच विचाराने श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे येथील ३५ वर्षांपूर्वी सोबत शिकलेले सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व माजी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी केला ईयत्ता दहावी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा आणि या टप्प्यानंतर प्रत्येक जण आपापल्या योग्यतेनुसार आवडी नुसार पुढच्या मार्गाची निवड करतो. त्याला आता 35 वर्षे झाली, साल होते 1990/91, श्री. मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे येथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने गेले, करिअरच्या मागे धावत असताना दोस्ताना भेटणं, बोलणं तर दुरच, संपर्कात राहणही होत नव्हतं. व्हॉ्सअँप आणि फेसबुक ने मैत्रीचा पण पुनर्जन्म घडविला, सर्वांना एकत्र आणलं अन साजरा झाला मैत्रीचा आनंद मेळावा श्री. मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे येथे दहावीच्या वर्गाचा ३५ वर्षानंतर स्नेह मेळावा आयोजित केला होता. सन १९९०-९१ बॅच वर्ष होते. या मेळाव्यामध्ये प्रत्येकजण जुने मित्र शिक्षक भेटल्यामुळे आनंदीत होते. प्रत्येक जण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत नावाने हाक मारीत होते. काही विद्यार्थी शिक्षक भेटल्यामुळे, चेहऱ्यावर प्रसन्न वातावरण दिसत होते. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्या जन्मदिनानिमित्त प्रत्येकाने एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भगवान मोरे यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करून झाडे लागवड करण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री सरके यांनी केले. विद्यार्थी भाषणामध्ये पोलीस उपनिरीक्षक युवराज हांडे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल करपे, प्रा. जालिंदर जाधव, अतुल गायकवाड, शिक्षिका जयश्री सरके, विमल कुटे, फातिमा शेख, रेखा शेळके, प्रा. डॉक्टर विजय गायकवाड, प्रा. यशवंत धुमाळ, केशव लवांडे, उद्योजक दत्ता शिंदे, प्रगतशील शेतकरी भरत कोकडे, दादाभाऊ बनकर, सुरेश जाधव, बाळासाहेब इंगळे, मा. सरपंच नंदकुमार दाभाडे, मा. सरपंच मच्छिंद्र इंगळे, उद्योजक दादा वाकचौरे, दत्ता वाकचौरे, दत्ता गाढवे, उद्योजक जितेंद्र गोडसे, उत्तम सात्रस, सरपंच सुनंदा कोळपे या सर्वांची मनोगते झाली. त्यानंतर शिक्षकांमध्ये मा. प्राचार्य रामचंद्र पंडित, मा. प्राचार्य सशांक पोळ, प्रा. राजकुमार जगताप, तुकाराम बेनके, तानाजी पठारे, तात्यासाहेब गायकवाड, क्रीडा शिक्षक तुकाराम गिरमकर, भानुदास सात्रस, प्रा. वसंत झांजे, प्रा. बाळासाहेब जाधव, प्रा. पद्माकर भोसले, प्रा. राजेंद्र बळीनवर, प्रा. श्यामल पंडित, या सर्वांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. यशवंत धुमाळ यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वीसाठी राजेंद्र सात्रस, सुभाष ठोंबरे, श्रीधर महामुनी, कमलाकर शितोळे, विठ्ठल कुंजीर, शौकत सय्यद, लक्ष्मण कोरेकर, रोहिदास कोरेकर, संजय सात्रस, प्रवीण गुरव, एकनाथ मयेकर, अनिल मोरे, सुनील कुटे, शिवाजी करपे, अनिल रणदिवे, सोमनाथ गेलोत, कृष्णा सोनवणे, युवराज कदम, पांडुरंग साबळे, सुभाष जराड, मा. सरपंच जयश्री सुतार, सुनिता आनंदे, संगीता खंडागळे, बानू परदेशी, सुनीता कोरेकर, वैशाली पवार, डिंपल मुथा, विजया ताथेड, शालन निंबाळकर, अनिता कोरेकर, नजमा शेख, राजश्री कदम, बाळासाहेब मदने, राजेंद्र शिंदे, दशरथ भालेराव या सर्वांनी विशेष प्रयत्न केले.