
दै.चालू वार्ता राजापूर प्रतिनिधी
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेते *सन्मा. राजनजी साळवी साहेब* यांच्या वाढदिवसानिमित्त *अभिष्टचिंतन सोहळा* दि.६ जुलै २०२४ रोजी मुंबई, दादर येथील सिटी पॉईंट हॉटेल, मध्ये साजरा करण्यात आला. संगमेश्वर – चिपळूण विधानसभा संपर्क प्रमुख *श्री. सुरेशजी कदम साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख *श्री राजेशजी शेलार,* राजापूर तालुका संपर्क प्रमुख *श्री अनिलजी भोवड,* लांजा तालुका संपर्क प्रमुख *श्री जगदीशजी जुलुम* यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सभागृहात प्रवेश करताच सुहासिनींनी आरती ओवाळून राजनजी साळवी साहेब यांचे औक्षण केले तसे उपस्थितांकडून त्यांचेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.राजनजी साळवी साहेब यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी अनुजा वहिनी व कुटुंब हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाला रत्नागिरी सिंधुदुर्ग चे लोकप्रिय माजी खासदार, शिवसेना नेते *सन्मा. विनायकजी राऊत साहेब रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष *श्री.पांडुरंग उपळकर* विभाग प्रमुख *महेश सावंत* उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुमधुर वाद्यवृंदाचे आयोजन करुन कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली व आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. गाण्याच्या तालावर साळवी साहेब व अनुजा वहिनी यांनी ठेका धरल्यावर उपस्थितांनी जणू त्यांना डोक्यावर घेतले. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. राजन साळवी साहेब यांना उत्तम, उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो तसेच त्यांना लवकरच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळून मंत्री पद मिळावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.शिवसेना सागवे विभागाच्या वतीने आमदार साळवी साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी दहीसर विधानसभा संघटक अविनाश लाड, राजापूर तालुका सहसंपर्कप्रमुख नामदेव नार्वेकर, जैतापूर गाव संघटक महादेव शिवलकर, नामदेवशेठ नाकटे,सागवे-नाखेरे गाव संघटक सुरेश मयेकर,आबा नागवेकर उपस्थित होते*. या कार्यक्रमाला राजापूर, लांजा व संगमेश्वर तालुक्यातील मुंबईवासिय यांनी साहेबांच्या प्रेमाखातर तुडुंब गर्दी केली होती. एवढी की सभागृहात दाटीवाटीने लोक उभे होते. तसेच साहेबांना पुष्पगुच्छां सहित शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. यावेळी स्नेह भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.