
दै.चालु वार्ता,
लातूर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
उदगीर : उदगीर येथे लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात विशाखा समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी विशाखा समितीच्या अध्यक्षा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभासद व माजी विद्यार्थिनी मोहिनी आचोले तर या बैठकीसाठी विशेष उपस्थिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांची लाभली होती.
बैठकीच्या सुरुवातीलाच विशाखा समितीच्या सचिव अनिता येलमटे यांनी प्रास्ताविकामधून सध्याच्या सामाजिक स्थित्यंतरांची माहिती देत कायदेविषयक जनजागृती व मुलींचे संरक्षण या संदर्भाने विवेचन केले.
या बैठकीमध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी विविध विषयावर साधक-बाधक चर्चा करत मुलींची सुरक्षितता यासंबंधी विवेचन केले. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ शिक्षिका प्रमोदिनी रेड्डी यांनी मुलींच्या सुरक्षितते संदर्भात शालेय शिस्त महत्त्वाची असे नमूद केले. यावेळी विद्यालयात मुलीच्या सुरक्षितते संदर्भात परिसरात सीसीटीव्ही लावणे व पोलीस चौकी ची मागणी करणे या संदर्भाने चर्चा झाली. समिती सदस्या प्रीती शेंडे यांनी गुड टच आणि बॅड टच या संदर्भाने मुलींना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे नमूद केले. ज्येष्ठ शिक्षिका शोभा नेत्रगावकर यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेशन करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला. समिती सदस्य लक्ष्मी चव्हाण व अनिता मुळखेडे यांनी माता पालक मेळावे या अनुषंगाने मत मांडले.
यावेळी मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांनी सीसीटीव्ही व तक्रारपेटी संदर्भात माहिती दिली. तसेच विद्यालयासाठी मुलींची सुरक्षितता प्राधान्यक्रमात असल्याचे नमूद केले. तर अध्यक्षीय समारोपात मोहिनी अचोले यांनी स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेपासून ते पोलीस चौकी पर्यंत विविध विषयावर आपली मते मांडली.