
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी :- संतोष मनधरणे
देगलूर : नांदेड जिल्हयात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसमधील चव्हाण यांचे कट्टर समर्थक व देगलूर बिलोली चे आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश करीत धक्का दिला होता. त्यानंतर अनेक काँग्रेसचे आमदार भाजप प्रवेश करतील अशी चर्चा होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीच नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही, तोच भाजपने त्यांना दुसरा राजकीय धक्का दिला आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर यांना निवडून आणले होते. त्यामुळे भविष्यात जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिले होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला व भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, खासदार अशोकरावजी चव्हाण, माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, मुखेड चे आमदार तुषार राठोड ,माझी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर तसेच देगलूर बिलोली मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.